Pages

Sunday, January 23, 2011

परिवर्तनाचे शिलेदार भास्करराव बनकर


ग्रामशिक्षण समिती ,पिंपळगाव बसवंत ता. निफाड  जि.नाशिक
 
                              सरकारी दवाखान्यासमोर ,पिंपळगाव बसवंत ता. निफाड ,जि.नाशिक
                                                                    फोन ०२५५० २५०५२२  ,                                                       
                                                  
                                       अध्यक्ष : श्री.भास्करराव बनकर         ९८२२७९०४८९ 



 
महाराष्ट्रात सर्वप्रथम 
श्री.भास्करराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली ,ग्रामशिक्षण समितीच्या माध्यमातून 
 जिल्हा परिषद शाळेत  खालील उपक्रम आम्ही सुरु केले
 
१)  पालकांना पैशांची कुठलीही झळ  न लागू  देता उदार देणगीदारांकडून सुमारे ८ लाख रु.लोकवर्गणी जमवून  १००० बेंचेस  मिळवून दिले 
2)  चेक्सचे डिझाईन असलेला आकर्षक गणवेश ,बूट व टाय सह, शिक्षकानाही गणवेश
३) पहिली ते तिसरी सेमी इंग्रजी माध्यम सुरु केले. जून २०१२ मध्ये चौथीचा सेमी इंग्रजीचा वर्ग सुरु होणार आहे. यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या , CBSE बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या व  fluent इंग्लिश बोलणाऱ्या शिक्षकांची
मागणी  करून जि.प.कडून असे शिक्षक  मिळविले
४ ) विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे शिक्षण ,इंटरनेट चे ज्ञान दिले जाते .
५) तीन मजली आर सी सी भव्य इमारत (पारंपारिक इमारतींपेक्षा नवी इमारत आर सी सी असण्याचा जि.प.कडे आग्रह धरला)
६) सुमारे ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले ,तीन दिवस साजरे होणारे व ५००० प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरे होणारे गेल्या   चार वर्षापासून सुरु असलेले बहारदार स्नेहसंमेलन .
७) प्रत्येक विद्यार्थ्याला गळ्यात ओळखपत्र असणे बंधनकारक
८) इंटरनेटवर स्वत:चा ब्लॉग असणारी  भारतातील ग्रामशिक्षण समिती
9) समितीचे  बहुतांश सदस्य  पदवीधर

आम्ही आभारी आहोत आमच्या उपक्रमांना सतत सहकार्य करणारे
नाशिक जि.प. चे सन्मानीय पदाधिकारी ,अधिकारी ,
निफाड पं.स. पदाधिकारी,अधिकारी , 
पिंपळगाव बसवंत येथील जि.प.  शाळेचे केंद्रप्रमुख ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक 
पिंपळगाव ग्रामपालिका ,पिंपळगावकर  नागरिक,पालक , उदार देणगीदार यांचे.
आम्ही फक्त निमित्त आहोत
तुमच्या सहकार्याशिवाय हे बदल घडूच  शकले नसते .
                                                                                                                                                                                        
                                                                                                                                                                                                                                                                                
         श्री  भास्करराव बनकर  

लोकसहभागातून प्राथमिक शाळांना संजीवनी देण्याचा वस्तुपाठ घालून देणारे व राज्यातील ग्रामशिक्षण समित्यांसाठी   रोल मॉडेल ठरलेले ग्रामशिक्षण समिती ,पिंपळगाव बसवंत ता. निफाड  जि.नाशिकचे अध्यक्ष श्री भास्करराव बनकर यांच्या झपाटलेल्या कार्याचा परिचय....
  


मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक पासून ३० कि.मी.अंतरावर ,पाराशरी नदीच्या तीरावर वसलेलं पिंपळगाव बसवंत हे आता शहर झालं आहे.द्राक्ष ,टोमॅटो व कांद्याची आशिया खंडातील मोठी बाजारपेठ आहे. असं म्हणतात की पिंपळगावकरांच्या व्यक्तीमत्वात पाहुण्यांचं आदरातिथ्य करताना द्राक्षाचा गोडवा ,  धाडसी आयुष्य जगताना टोमॅटोचा आंबटपणा आणि संकटांचा सामना करताना कांद्याचा झणझणीत ठसका ठासून भरलेला आहे.वार्षिक २००० कोटींची उलाढाल या बाजारपेठेत होते.     येथील ग्रामपालिका ही महाराष्ट्रातील मोठी  ग्रामपालिका असून तिचे वार्षिक उत्पन्न सुमारे ५ कोटी रु. आहे.या ग्रामपालिकेचे सरपंच म्हणून काम करण्याचा २० वर्षाचा अनुभव भास्करराव बनकर यांना आहे. शिवाय निफाड  पंचायत समितीत सौ.वैशालीताई भास्करराव बनकर या विद्यमान सदस्य आहेत.जिल्हा परिषदेत साहेबराव पारधे हे भास्करराव बनकर यांचे अनुयायी आहेत. त्यामुळे या सर्व माध्यमांचा योग्य वापर करत भास्करराव बनकर यांनी पिंपळगाव ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष या नात्याने पिंपळगाव येथील प्राथमिक शाळेत शिस्त ,गुणवत्ता ,पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करत  येथील जि.प. शाळेत नवनवीन प्रयोग ,अभिनव उपक्रम सुरु करून आमूलाग्र बदल घडवून आणला .
 
 विद्यार्थी गळतीच्या संकटाचा केला यशस्वी सामना  
शिस्त, गुणवत्ता ,पारदर्शिता या त्रिसूत्रीचा अवलंब 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शैक्षणिक सुविधा व दर्जा सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा वस्तुपाठ पिंपळगाव ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष व पिंपळगावचे  सरपंच भास्करराव बनकर यांनी महाराष्ट्रासमोर  उभा केला आहे. अलीकडे ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा असल्याने मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांपुढे विद्यार्थी संख्या गळतीचे संकट उभे राहिले आहे. २००२ मध्ये पिंपळगाव ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर भास्करराव बनकर यांनी सर्वप्रथम या संकटाचा सामना करण्याचा निश्चय केला.
   
या शाळेत नोकरदार ,शेतमजूर, आदिवासी, दलित ,शेतकरी ,रोजंदारीवरील कामगार,सफाई कामगार अशा सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत आहेत.लहान गावातील शाळांपेक्षा पिंपळगावातील २७५० विद्यार्थी असलेल्या  १० शाळांचे नियोजन करणे  ही सोपी गोष्ट नव्हती.इंग्रजी माध्यमाच्या दोन व मराठी माध्यमाची एक शाळा अशा स्पर्धेला तोंड देत उरलेल्या विद्यार्थ्यांमधून जिल्हा परिषद शाळांचे  विद्यार्थी टिकवण्यासाठी शिस्त, गुणवत्ता ,पारदर्शिता या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे त्यांनी ठरवले.या त्रिसुत्रीनुसार त्यांनी कामाला सुरुवात केली. पालक सभा घेऊन पालकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पालकांनी काही शिक्षकांविषयी  गैरवर्तन , विद्यादानाऐवजी इतर उद्योग जास्त करत असल्याच्या तक्रारी केल्या . अशा शिक्षकांची गय न करता  त्यांच्या बदलीची जि.प. कडे मागणी करून उपक्रमशील ,गांभीर्यपूर्वक अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना  प्रोत्साहन दिले. शाळासुधार निधीतून दरवर्षी तेच ते साहित्य खरेदी करणाच्या वृत्तीला चाप बसवून आधुनिक शिक्षण साहित्य खरेदी करण्यास सुचवले.शालेय निधी रचनात्मक गोष्टीसाठीच खर्च झाला पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष दिले.
 ग्रामशिक्षण समितीच्या माध्यमातून एखादी व्यक्ती झपाटल्यागत काम करून आमुलाग्र बदल घडवून आणते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पिंपळगाव ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष व पिंपळगावचे  सरपंच भास्करराव बनकर !



बदलाची सुरुवात गणवेशापासून
शिक्षणाचा दर्जा चांगला असला तरी मराठी शाळांचा outlook बदलणे आवश्यक असल्याचे भास्कररावांचे मत त्यांनी पालकांच्या सभेत व्यक्त केले.बदलाची सुरुवात गणवेशापासून करू या. असे पालक सभेत मत मांडले  व गणवेश बदलण्याचा निर्णय पालकांच्या संमतीने घेतला .गावातील कापड  व्यापाऱ्यांना या बदलाची कल्पना दिली. व १२५ रुपयात ड्रेस उपलब्ध होऊ शकेल अशा किमतीचे वचन व्यापाऱ्यांनी दिले.त्यामुळे सर्वसामान्य पालकांवर जास्त बोझा पडणार नाही याचीही काळजी घेतली गेली .
                 पारंपारिक सफेद - खाकी गणवेश बदलून  इंग्रजी माध्यमांच्या सारखा आकर्षक गणवेश ,टाय ,बूट असा पेहराव दिल्याने विद्यार्थी हरखून गेले .त्यांच्यात  आत्मविश्वास आला .शिक्षकांचाही  गणवेश बदलला . इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेत आपण गबाळे न राहता उत्तम गणवेश परिधान करून मुलांना आत्मविश्वासाचे बळ दिले. 

विद्यार्थ्यांना बसण्यासाठी १००० बेंचेस
८ लाख रु.लोकवर्गणी जमवून १००० बेंचेस लोकवर्गणी गोळा करून शाळेला मिळवून दिले 
 उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच इंग्रजी माध्यमाच्या तोडीच्या भौतिक सुविधा उभारणे गरजेचे आहे, हे भास्करराव बनकर यांनी  समिती सदस्यांना ,पालकांना विश्वासात घेऊन सतरंजीवर बसणाऱ्या मुलांना बेंचेस मिळवून दिले.  पिंपळगाव येथे एकूण १० शाळा असून २७५० विद्यार्थी आहेत एवढ्या मोठ्या संख्येला बेंचेस मिळवणे अवघड काम होते.या शाळेत सर्वसामान्यांची  ,शेतकरी, शेतमजूर ,दलित, आदिवासी  यांची मुले शिकत असल्याने त्यांना कुठलीही झळ लागू न देता   त्यांनी उदार देणगीदार शोधले.   शाळेत बदल होत असलेला पाहून अनेक आश्रयदाते पुढे आले. गावातील संस्था, उद्योगपती,अनेकांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एका वर्गाला लागणारे बेंच दिले. आजमितीस जमलेल्या ८ लाख रुपयातून १००० बेंचेस मिळवून दिले असून उर्वरित ४०० बेंचेस २०१२ पर्यंत पूर्ण होतील असा प्रयत्न सुरु आहे. देणगीदारांचा यथोचित सन्मान शाळेच्या कार्यक्रमात करण्यात येतो.लोकसहभागातून एखादी व्यक्ती शाळेला किती मोठे योगदान मिळवून देते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

                 जुन्या इमारती कौलाच्या असल्याने पाऊस झाला की गळत असत  .पं स.च्या माध्यमातून बनकरांनी ३लाख ७५ हजार रुपयांचे पत्रे  मिळवून दिले.व हि गळती कायमस्वरूपी थांबली.मात्र उन्हाळ्यात पत्रे गरम होत असल्याने २८ खोल्यांमध्ये पंखे बसवले.त्यासाठी एका उदार आश्रय दात्याने बहुमोल मदत  केली .प्रत्येक वर्गात इलेक्ट्रिक कनेक्शन जोडलेले आहे.हा खर्च लोकवर्गणीतून केला गेला.


कॉम्प्युटरचे शिक्षण मिळण्यासाठी आग्रही भूमिका 

मराठी  शाळेतील   विद्यार्थ्यांना  कॉम्प्युटरचे  शिक्षण मिळावे ही इच्छा भास्करराव बनकरांच्या मनात  होती. मात्र जि.प. कडे यासाठी मोठ्या निधीची तरतूद नव्हती .भास्करनानांनी ग्रामपंचायत सदस्यांचे मत यासाठी वळवले व पिंपळगाव ग्रामपंचायतीने मराठी शाळेला  ४ कॉम्प्युटर भेट देण्याचा निर्णय घेतला .कॉम्प्युटरसाठी स्वतंत्र खोली (CRC रूम) ची व्यवस्था करण्यात आली .
                                                                     टप्प्या टप्प्याने कॉम्प्युटरची संख्या वाढवत ३० पर्यंत नेण्याचा विचार असून यासाठी मोठा हॉल बांधून त्यात एकाच वेळी ३० मुलांचा एक वर्ग एकाच वेळी शिक्षण घेऊ शकेल असा प्रयत्न सुरु आहे. उदार देणगीदारांच्या मदतीने शाळेला ही मदत मिळवून देण्याचा मानस आहे.



   
नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मा.दिलीप थेटे च्या हस्ते कॉम्प्युटर प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात आले.
     त्याप्रसंगी थेटे यांचे समवेत भास्करराव बनकर जि.प.सदस्य  साहेबराव पारधे व ग्रामशिक्षण समिती सदस्य 




पालक मेळावा


निर्भीडपणे मत व्यक्त करणाऱ्या महिला

साईनगर, चिंचखेड रोड येथील मेळाव्यास उपस्थित पालक
विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पालक मेळावे उपयुक्त ठरल्याचे ग्रामशिक्षण समितीचे मत आहे.विचारांच्या अदानप्रदानामुळे  शाळेच्या  विकासाची नेमकी दिशा आपल्याला ठरवता येते .विद्यार्थी कुठे कमी पडतात हे शिक्षक यावेळी पालकांना सांगतात .पालकांच्या अपेक्षा ,सूचना विचारात घेऊन पुढील निर्णय घेतले जातात.

सूचना मांडणारे जागरूक  पालक 
                                                                              पिंपळगावात तिन किमी  परिसरात एकूण दहा         शाळा असून या सर्व शाळात पालक मेळावे घेतले जातात .ग्रामशिक्षण समितीचे सदस्य  या मेळाव्यास उपस्थित असतात .याशिवाय महत्वाच्या निर्णय प्रसंगी   खास पालकसभा आयोजीत  करण्यात येते .गणवेश बदलणे ,सेमि इन्ग्लीश सुरू करणे याविषयी विशेष पालकसभा आयोजित करण्यात आली होती .



मेळाव्यास  मार्गदर्शन करताना  ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष भास्करराव बनकर


                           














स्नेहसंमेलन
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा उपक्रम चार वर्षांपासून सुरू केला आहे.पहिल्या वर्षी एका दिवस संमेलन साजरे झाले .पुढील दोन वर्षे २ दिवस .व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याने यावर्षी २० ,२१,२२ जानेवारी २०११  या काळात तिन दिवस संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.जि.प. चे शिक्षण सभापती मा. राजेंद्र चव्हाणके यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले.
                                                                              या संमेलनासाठी ५० हजार रुपये खर्च येतो. या खर्चासाठी प्रायोजक पुढे येत असल्याने शाळेला कुठलाही खर्च करावा लागत नाही. पारितोषिक वितरणाला नामवंत पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येते .
पारितोषिक म्हणून स्मृतीचिन्ह ,प्रमाणपत्र ,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात येतो. परीक्षक म्हणून शाळेबाहेरील कलाक्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात येते .विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या शाळेतील तसेच शाळेबाहेरील मार्गदर्शक ,कोरेओग्राफर्स  यांचाही सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात येते .त्यामुळे शाळेला मदत करणाऱ्याची कधीच कमतरता पडत नाही.


२२ जाने.२०११ रोजी सादर झालेल्या व महाराष्ट्राच्या    ग्रामीण   संस्कृतीचं  दर्शन  घडवणाऱ्या  '
    ''वासुदेव गीताचा'   खालील व्हिडीओ बघा
 पहाटेचं मंगलमय वातावरण  प्रभावीपणे सादर करून शाळा क्र. २ च्या विद्यार्थ्यांनी रसिकांची मने जिंकली .


'

   
गेली माझी सख्खी बायको गेली  - समूह नृत्य  सादरकर्ते शाळा क्र.४ (  आहेरगाव रोड )




नृत्य -  आता वाजले की बारा  .....  सादरकर्ती -  शाळा क्र २   ची विद्यार्थिनी  कु. सानिका खापरे
या चिमुरडीने आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांचे अक्षरश: बारा वाजवले


                                                


                               शाळा क्र१  ची विद्यार्थिनी  कु. श्रुती बोढाई हिने सादर केलेलं  ''आम्ही नाही जा ..''  हे बहारदार नृत्य ,श्रुतीचे हावभाव तिला अगदी perfect dancer म्हणून सिद्ध करतात 

  
                                           


शाळा क्र २   ची विद्यार्थिनी  कु. तनिष्का शिंदे हिने सादर केलेलं  कशी मी जाऊ मथुरेच्या बाजाराला ..'' हे बहारदार नृत्य , नृत्याची उत्तम समज ,अचूक पदन्यास याचा सुरेख संगम या नृत्यात झाला आहे.



आता थोडा विरंगुळा ... हे दोन थापाडे काय थापा मारतात हे बघू या. संवाद विसरल्यावर एकमेकांना सावरून घेण्याचं त्यांचं कौशल्य लाजबाब ! बनवाबनवीसादर केली शाळा क्र.१  चे विद्यार्थी  चि. ॠषीकेश दंडगव्हाळं  , चि. हार्दिक तोडकर यांनी





पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील प्राथमिक मराठी  शाळेत स्नेहसंमेलनात (२०१० ) बाल कलाकारांची दिलखेचक नृत्य अदाकारी.